आज, उद्या नाशिकमधील हे रस्ते बंद, इथे आहे पार्किंग

I

सिंहस्थ ध्वजारोहण, गोदाआरतीसाठी रामकुंड परिसरात वाहतूक बंदी

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या प्रारंभानिमित्त होणारा धर्मध्वज मिरवणूक सोहळा, ध्वजारोहण आणि गोदाआरती या कार्यक्रमांसाठी नाशिक शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. ३० ऑक्टोबर रोजी धर्मध्वज मिरवणूक तर, ३१ ऑक्टोबर रोजी ध्वजारोहण आणि गोदाआरती होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह राज्य व राष्ट्रीय स्तरावरील मान्यवर या सोहळ्यांना उपस्थित राहणार असल्याने रामकुंड, गोदाघाट आणि परिसरातील प्रमुख रस्त्यांवर नो एण्ट्री करण्यात आली आहे.

या सोहळ्यासाठी राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, लोकप्रतिनिधी, संत-महंत आणि भाविकांची मोठी उपस्थिती अपेक्षित आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने तसेच गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी विशेष नियोजन केले आहे. पोलीस उपायुक्त चंद्रकांत गवळी यांनी यासंदर्भातील वाहतूक अधिसूचना जारी केली आहे. कार्यक्रमांना येणाऱ्या भाविकांसाठी विविध ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून, तेथून पुढे संबंधित घाट आणि कार्यक्रमस्थळापर्यंत पायी जाण्याचे मार्ग निश्चित केले आहेत.

रामकुंड परिसरात वाहतूक बंदी, पार्किंग आणि मार्ग नकाशा (ट्रॅफिक आणि पार्किंग मार्गदर्शन ग्राफिक)
रामकुंड परिसरात वाहतूक बंदी, पार्किंग आणि मार्ग नकाशा

गोदाआरती पार्किंग

गोदाआरतीसाठी मालेगाव स्टॅण्ड ते मखमलाबाद नाका, वल्लभ पीठ, संभाजी महाराज गार्डन, रविवार कारंजा, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, रुग्णालय परिसर, बी. डी. भालेकर मैदान, शिंदे मळा, श्रद्धा लॉन्स आणि केटीएचएम महाविद्यालय या ठिकाणी वाहनतळ उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

गोदा आरतीसाठी पार्किंग व्यवस्था (पार्किंग मार्गदर्शन ग्राफिक)
गोदा आरतीसाठी पार्किंग व्यवस्था

ध्वजारोहण सोहळ्यासाठी येथे आहे पार्किंग

ध्वजारोहण सोहळ्यासाठी गांधीतलाव आणि यशवंत महाराज पटांगण परिसरात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय गंगापूर रोड, गुरांचा दवाखाना, सिद्धेश्वर मंदिर आणि संभाजी महाराज गार्डन या ठिकाणी वाहने उभी करून भाविकांना निर्धारित मार्गाने पायी कार्यक्रमस्थळी जाता येणार आहे.

शहरातील या रस्त्यांवर ‘नो एण्ट्री’

रामकुंडाकडे जाणाऱ्या रविवार कारंजा, होळकर पूल, मालेगाव स्टॅण्ड, पंचवटी कारंजा, दिंडोरी नाका, मखमलाबाद नाका, सरदार चौक, मालवीय चौक आणि शनी चौक परिसरातील मार्गांवर निर्बंध राहणार आहेत. रामसेतू आणि गाडगे महाराज पुलावरील वाहतुकीतही बदल करण्यात येणार आहेत. गोदाआरतीवेळी एकमुखी दत्त मंदिर, गांधी तलाव, यशवंत महाराज पटांगण, कापुरथळा मैदान, रोकडोबा मैदान आणि विविध घाटांकडे जाणारे मार्गही बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी कार्यक्रमाच्या वेळेत संबंधित भागात वाहन घेऊन जाणे टाळावे.

गोदाआरतीसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी पार्किंग व्यवस्था

  • मालेगाव स्टॅण्ड ते मखमलाबाद नाका
  • वल्लभ पीठ
  • संभाजी महाराज गार्डन
  • रविवार कारंजा
  • छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम
  • रुग्णालय परिसर
  • बी. डी. भालेकर मैदान
  • शिंदे मळा
  • श्रद्धा लॉन्स
  • केटीएचएम महाविद्यालय

ध्वजारोहणासाठी पार्किंग व पायी जाण्याचे मार्ग

  1. गुरांचा दवाखाना किंवा सिद्धेश्वर मंदिर येथे पार्किंग केल्यानंतर संभाजी महाराज गार्डन येथून आहिल्यादेवी होळकर पुलाखालून एकमुखी दत्त घाट आणि गांधी तलावाकडे पायी जाता येईल.
  2. अशोकस्तंभ, रविवार कारंजा येथे पार्किंग केल्यानंतर सराफ बाजार, बालाजी मंदिर आणि निळकंठेश्वर घाटमार्गे गांधीतलाव येथे पोहोचता येईल.
  3. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे पार्किंग केल्यानंतर रेडक्रॉस सिग्नल, धुमाळ टी पॉइंट, नेहरू चौक, दिल्ली दरवाजा आणि रोकडोबा मैदान हा पायी जाण्याचा मार्ग असेल.
  4. अशोकस्तंभ, राठी स्कूल येथे पार्किंग केल्यानंतर सिद्धेश्वर मंदिर आणि होळकर पुलाखालून एकमुखी दत्त घाट, गांधी तलाव येथे जाता येईल.
  5. बी. डी. भालेकर मैदान येथे पार्किंग केल्यानंतर रेडक्रॉस सिग्नल, धुमाळ टी पॉइंट, नेहरू चौक, दिल्ली दरवाजा आणि रोकडोबा मैदानमार्गे कार्यक्रमस्थळी जाता येईल.
  6. तपोवन क्रॉसिंग, स्वामीनारायण मंदिर, अमरधाम, शिंदे मळा येथे पार्किंग केल्यानंतर येथून गौरी पटांगण, म्हसोबा पटांगण आणि जुने भाजी पटांगण येथे पायी जाता येईल.
  7. ट्रॅक्टर हाऊस, नानावली पोलीस चौकी, अमरधाम पूल येथे पार्किंग केल्यानंतर शिंदे मळा येथे वाहन पार्क करून गौरी पटांगण आणि जुने भाजी पटांगण येथे जाता येईल.
  8. गणेशवाडी देवी चौक, फुलबाजार, गौरी पटांगण येथे पार्किंग केल्यानंतर येथे वाहन पार्क करून जुने भाजी पटांगण येथे पायी जाता येईल.
  9. काट्या मारुती चौक, देवी चौक, अमरधाम रोड येथे पार्किंग केल्यानंतर शिंदे मळा येथे वाहन पार्क करून गौरी पटांगण, म्हसोबा पटांगण आणि भाजी पटांगण येथे जाता येईल.

ध्वजारोहण सोहळ्यावेळी राहणारे बंद असलेले मार्ग

  • रविवार कारंजा ते होळकर पूल
  • मालेगाव स्टॅण्ड ते पंचवटी कारंजा
  • दिंडोरी नाका ते मखमलाबाद नाका
  • मालेगाव स्टॅण्ड ते रामकुंड
  • सरदार चौक ते रामकुंड
  • रामकुंड ते मालवीय चौक
  • मालवीय चौक ते पंचवटी कारंजा
  • शनी चौक ते रामकुंड
  • गाडगे महाराज पूल
  • रामसेतू पूल

गोदाआरतीवेळी बंद असलेले मार्ग :

  • एकमुखी दत्त मंदिर, गांधी तलाव, यशवंत महाराज पटांगण, कापुरथळा मैदान आणि रोकडोबा मैदान परिसरातील घाट
  • गुरांचा दवाखाना, घारपुरे घाट, सिद्धेश्वर मंदिर, फनीबाबा दरगाह, डांगर उतार ते एकमुखी दत्त मंदिर
  • अशोकस्तंभ, रविवार कारंजा, मंगेश मिठाई, सराफ बाजार, भांडी बाजार आणि बालाजी मंदिर परिसर
  • धुमाळ पॉइंट, प्रकाश सुपारी, नेहरू चौक आणि दिल्ली दरवाजा
  • रविवार कारंजा, मेन रोड ते धुमाळ पॉइंट
  • रामसेतू पूल आणि गाडगे महाराज पूल
  • रविवार कारंजा, होळकर पूल, मालेगाव स्टॅण्ड, पंचवटी कारंजा आणि दिंडोरी नाका
  • मखमलाबाद नाका, मालेगाव स्टॅण्ड, रामकुंड आणि सरदार चौक
  • रामकुंड, मालवीय चौक आणि पंचवटी कारंजा
  • शनी चौक ते रामकुंड

🎥 व्हिडिओ बातम्या पाहायच्या आहेत? कुंभमेळा २०२७ चे व्हिडिओ, वार्तांकन आणि थेट प्रक्षेपण आमच्या YouTube चॅनेलवर पाहा.

▶ YouTube चॅनेल पाहा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *