
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला गती; गर्दी व्यवस्थापन, सूक्ष्म नियोजन आणि कामे वेळेत पूर्ण करण्यावर पालकमंत्री गिरीश महाजन यांचा भर.

नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ ची अधिकृत सुरुवात ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार आहे. त्या दिवशी दुपारी १२:०२ वाजता — अभिजित मुहूर्तावर — नाशिकच्या पंचवटीतील रामकुंड आणि त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त तीर्थ या दोन्ही ठिकाणी एकाच वेळी ध्वजारोहण होईल. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका ठिकाणच्या कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तर दुसऱ्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…